Dargah Talim a symbol of Hindu  Muslim unity Nipani marathi news
Dargah Talim a symbol of Hindu  Muslim unity Nipani marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक असलेली 'ही' वास्तू नामशेष होण्याच्या पंक्‍तीत

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव  : हिंदू-मुसलमान ऐक्‍याचे प्रतीक म्हणून कामत गल्लीतील पिरशहा खतालवाला दर्गा तालमीला ओळखले जाते. या तालमीची स्थापना १९५६ मध्ये करण्यात आली. दिवंगत थानाप्पा टोपाण्णा सपले, सय्यद मनुपाशा व काशीमपाशा मुवळी या मित्रांनी कुस्तीच्या प्रेमाखातर या तालमीची स्थापना केली. तालमीला वैभवशाली इतिहास आहे. या तालमीने अनेक नामवंत मल्ल तयार केले. त्यांनी बेळगावचे नाव सर्वदूर पोचविले. 

सुरवातीच्या काळात चव्हाट गल्लीचे वस्ताद केदारी मोहिते, शिवाजीनगरचे जोतिबा मेलगे यांनी तालीम सांभाळली. तालीम २० बाय ३० फूट आकाराची असून त्याच्या बाजूलाच मल्लांच्या जेवणाची व राहण्याची सोय आहे. तालमीत दोन स्वच्छतागृहे, एक विहिर व विश्रांतीसाठी एक लहानसी खोली आहे. दर्गा तालीमचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले असून या तालमीला हिंद केसरी मास्टर चंदगीराम, हिंदकेसरी मारुती माने, महादेव सप्ले, लक्ष्मण काकती या मल्लांचे पदस्पर्श लागले आहेत. या तालमीत आंतरराष्ट्रीय मल्ल रत्नकुमार मठपती, पहिले महापौर केसरी गुंडू पाटील, कर्नाटक केसरी कल्लाप्पा शिरोळ, चंदू करवीनकोप्प यांनी सराव करुन बेळगावचे नाव गाजविले आहे.

त्यानंतर निवृत्त सुभेदार मेजर व एनआयएस प्रशिक्षक शिवाजी चिंगळे सध्या वस्ताद म्हणून या तालमीची धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालीमची घोडदौड सुरू आहे. १९७४ मध्ये ख्राईस्टचर्चमध्ये (न्यूझीलंड) झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत त्यांनी कुस्तीत भारताला रौप्य पदक मिळवून दिले. त्यानंतर इराणमध्ये झालेल्या एशियन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले. १९९४ व १९९७ मध्ये भारतीय कुस्ती संघाचे प्रशिक्षक म्हणून पदभार सांभाळला होता. सध्या ते उदयोन्मुख मल्लांना प्रशिक्षण देत आहेत.

सुमारे ६५ वर्षांची परंपरा लाभलेल्या या तालमीची सध्या दूरवस्था झाली आहे. तरीसुद्धा सध्या १० ते १२ मल्ल या तालमीत सराव करीत आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कोणतीही सुविधा नसताना मल्ल सराव करतात. या तालमीकडे सध्या स्थानिक कमिटी व प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे. त्यामुळे, नामशेष होत असलेल्या तालमीच्या पंक्‍तीत दर्गा तालीम जमा होण्याची शक्‍यता आहे. मल्लांची संख्या वाढवायची असेल तर तालमीचा विकास होण्याची गरज आहे. त्यासाठी कुस्तीप्रेमी व प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. तालमीचे नूतनीकरण करण्यासह विविध सुविधाही पुरविण्याची गरज आहे. 
- चंद्रकांत पाटील, बेळगाव

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT